Sunday, August 16, 2009

Heartfelt!

The following song keeps on playing back to back in my MP3 player continuously these days. I love this song for some strange reason.It has been penned down by Kavi Grace and sung by Lata Mangeshkar. Its the flavour of the month for me. At times the kind of music one chooses determines the mood of the listener or rather elevates it. All I know is this song pulls some chords in my heart!! Call it some strange Music Therapy.......

Bhay ithle sampat nahi..." (kavi grace)
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

4 comments:

Saurabh said...

आमच्या इकडे आजकाल सगळी गाणी फक्त वेगळ्या शब्दात वाजतात...
(उदाहरण द्यायचं झालं तर हेच गाणं काहीस असं असेल...)

तिष्ठणे इथले संपत नाही, मी अजूनी बेरोजगार पडूनी आहे,
दिवस रात्र मी केलेली, ऍप्लिकेशन्स तशीच पेंडिंग आहे...

मी करे अर्ज नोकऱ्यांचा, अन ह्यांतच वेळ जातो वाया,
नाहीच कसला प्रतिसाद, जराशीही उमेद जागवाया...

ह्या रिसेशनच्या नाजूक वेळी, नोकऱ्या गमावून बसती,
हाती घेऊन रिझ्यूमे, दारोदारी कंपन्यांच्या फिरती...

हा झोल नियतीचा सगळा, आयुष्य रखडवूनी गेला,
आर्थिक मंदीच्या दुष्काळात जणू, तेरावा महिना आला...

जाऊनी पलिकडे सगळ्याच्या, मी म्हणे स्वतःला जरा थांब,
कोरड पडली घशास माझ्या, मी इतकी मारली बोंब...

बिगारी कामातील मजूरासम, मी झटलो हो नेटाने,
डोक्यात घालती गोंधळ, विचारांचे अगणित भुंगे...

बधिर इंद्रिये अवघी, हरपुन भान जाणिवांचे,
हे सरता संपत नाही, ग्रहण माझ्या दुर्दैवाचे...

हे सगळे अवेळी होते, फास्यांनी चुकविली खेळी,
मेंदुत राहीली माझ्या, विणलेली कोळ्यांची जाळी...

Deepti said...

haha nice one!!

iron_maiden said...

Saurabh u write absolutely amazing stuff! Paste this poem on ur blog!! It is so direct dilse!!

अनघा said...

'आमच्या इकडे आजकाल सगळी गाणी फक्त वेगळ्या शब्दात वाजतात...'
:D :D
झकास जमलेले आहे विडंबन! अजून कुठली कुठली गाणी वेगळ्या शब्दांत वाजतायत??