Sunday, January 8, 2012

श्तृप्रेम


मला प्राणी आवडत असले तरी उंदीर हा माझा आवडता प्राणी नाही. किंबहुना मी प्राणी मित्र असले तरीही उंदरांची मला जरा भीतीच वाटते. अहो जरा म्हणजे घरी उंदीर मामा शिरले कि मी सोप्या वरून पाय खाली ठेवत नाही...माझा घरातली  त्यांची  vaccation होइस तोवर मीच आश्रीतासारखी राहते. रात्री एकवेळ चोराची किव्वा भूता खेताची वाटणार नाही इतकी भीती मला या बिन बुलाये मेहमानांची ची वाटते. एकदा लहानपणी  पायावरून उंदीर गेल्या पासून भयाचा रुपांतर भीतीत म्हणजेच फोबिया मध्ये झाले.

पण परवा मात्र मी माझ्या या शत्रूची चक्क चक्क मदत केली. अहो नुसत्या शत्रू ची नाही तर त्याचा आख्या कुटुंबाची मदत केली. नेहमी प्रमाणे सदाशिव पेठेत कामा करिता गेलेले असताना मला एका वाण्यचा दुकाना बाहेर एक वेगळाच खेळ दिसला. गळ्यात एक छोटीशी घंटा बांधलेले एक गोंडस काळे-पांढरे  मांजर इकडून तिकडून उड्या मारत खेळत होतं. त्याचा तो लहान मुलांसारखा निरागस खेळ पाहिला माझी पावलं जग्यचा जागी थांबली. मनात आले फोटो काढूयात म्हणून कॅमेरा बाहेर काढला पण फोटो घायचे धाडस झाले नाही. कारण मला गोंडस वाटणारे मांजर एका जुन्या उंदरांच्या  पिंजऱ्याशी खेळत होतं. पिंजर्यात ज्याला आपण मौस म्हणतो त्या जातीचे ६ छोटे छोटे उंदीर होते. मांजर सारख लांब जायचं मग पळत येऊन पिंजर्यावर झप्तयचं. सगळे उंदीर जीव मुठीत घेऊन एका कोपर्यात सरकून बसले होते. मांजर सारखं येऊन त्यांना नखं मारायचं. आता मला तो सारा खेळ गोड न वाटता भयाण वाटू लागला.

आपल्या मरणाला आपल्या इतक्या जवळ पाहून त्या येव्धुषा उंदरांना कसे वाटले असेल हे माझा मनात आले. शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्रिया असतो मग तो छोटासा उंदीर असो किव्वा विचार करू शकणारा माणूस असो. आपण इतक्या वेळ त्या मांजराचा हा क्रूर खेळ एन्जोय करत होतो हि गोष्ट माझा मनाला टोचायला लागली. एक क्षणभर विचार करून मी त्या मांजराला तिकडून पळवून लावले. मला खूप वाटत होतं कि आपण त्या दुकानदाराला सांगूयात कि त्या उंदरांना कुठे तरी दूर सोडून द्या. त्या मांजराला ते खायला देऊ नका. पण मुळातच दुकानदाराला त्रासदायक आणि उपद्रव ठरलेल्या प्राण्यांची मदत त्याने केली असती का? मी काहीचः न बोलता तिथून काढता पाय घेतला.

जाताना एकदा परत वळून पाहिलं - खात्री केली कि मला गोंडस वाटणारा आणि उंदरांसाठी भक्षक ठरणारं मांजर परत तर आलं नाही न. मांजर कुठेच नवतं. पण ते परत येणार हे  नक्की होतं. उंदीर मात्र तसेच भेदरलेल्या अवस्थेत एका कोपर्यात बसून होते. त्याच रस्त्यावरून अर्ध्या तासाने परत जाताना मी पिंजर्या कडे पाहणे टाळले. कुठेतरी अपयाश्ची अणि गिल्ट ची  भावना होती आणि भीती हि. दुकानदाराने जर ते उंदीर स्वताहून मांजराला खायला दिले असतील तर.....मी माझा मार्ग पकडला.

माझा मनाच्या पिंजर्याच्या एका कोपर्यात मात्र कुठले तरी विचार दाटत होते.


After a lot of motivation  from Bongs -I have finally mustered  up the courage to write in Marathi - my mother tongue and this is my maiden attempt at it. I hope I will  do better with every new post. This one is dedicated to one of the best Marathi Bloggers Ever - Bongs! :-)

P.S. By the way it is also part of my "achievable" New Year Resolutions 2012 to pen my expressions in different languages.






4 comments:

Aakash said...

तुझ्या वतीने केलेल्या धडपडीची नोंद नक्कीच कुठेतरी झालेली आहे! चला, आज तुझ्या मनातून उंदराची भीती नाहीशी झाली! अश्याच एक एक गोष्टीवर मात देत पुढे जाणाऱ्या के-जो-केला सलाम. अन् बाबा Bongs चा विजय असो!!

Anonymous said...

This shows you have a beautiful heart and a beautiful mind. You are so caring and kind even with animals you hate. Certainly it is an amazing combination of beauty Physical and internal.

Nilesh said...

केतकी, सर्व प्रथम मराठीतल्या तुझ्या पहिल्या ब्लॉग बद्दल अभिनंदन. पहिल्या प्रयात्नांतले तुझे लेखन चांगले झाले आहे पण थोडे व्याकरणावर लक्ष द्यावे लागेल. तुझ्या लेखन कौशल्याची व सर्जनशीलतेची तारीफ आधीच केली आहे. अशीच लिहित रहा.

मामा

सौरभ said...

ओय मै इमोसनल हो गया... Megh, that is really sweet of you to remember me and dedicate a post to me. It is a wonderful new year gift for me. Congratulations on completing one of your new year resolution. Many many best wishes for all the coming days of this and all the coming yearsss... :)